महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात आगळावेगळा फॅशन शो, मॉडेल्सचा प्लास्टिक कचऱ्यापासून बनलेले कपडे घालून रॅम्पवॉक - वनराई संस्था पुणे

माय अर्थ फाउंडेशन तर्फे या शोचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, पुणे महानगरपालिका, वनराई संस्था आणि दीपाली सय्यद फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा फॅशन शो यशस्वी झाला. यावेळी मॉडेल्सनी प्लास्टीक बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या, सॅनिटरी पॅड व इतर टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले ड्रेस घालून रॅम्पवॉक केला.

walk
पुण्यात मॉडेल्सनी केला प्लास्टिक कचऱ्यापासून बनलेले कपडे घालून रॅम्पवॉक

By

Published : Dec 2, 2019, 7:17 PM IST

पुणे - शहरात प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी एका आगळ्यावेगळ्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल्सनी चक्क प्लास्टिक कचऱ्यापासून तयार केलेले पोशाख परिधान केले होते. मिस आणि मिसेस अर्थ या स्पर्धेच्या आयोजनातून पर्यावरण रक्षणाचा संदेश पुणेकरांना देण्यात आला.

प्लास्टिक कचऱ्यापासून बनलेले कपडे घालून रॅम्पवॉक
माय अर्थ फाउंडेशन तर्फे या शोचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, पुणे महानगरपालिका, वनराई संस्था आणि दीपाली सय्यद फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा फॅशन शो यशस्वी झाला. यावेळी मॉडेल्सनी प्लास्टीक बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या, सॅनिटरी पॅड व इतर टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले ड्रेस घालून रॅम्पवॉक केला.

हेही वाचा -ईशान्येकडील विद्यार्थ्यांचा फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमांकडे वाढतोय कल

मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे योग्य नियोजन व्हावे. तसेच त्याचा पुनर्वापर केला जावा, हा संदेश देण्याच्या दृष्टीकोणातून या फॅशन शोचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details