शिरुर (पुणे)- देशात कोरोनाचा संसर्ग जसा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तसा शेतात काबाड कष्ट करणारा बळीराजा हतबल होत चालला आहे. राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीमालासह फळबागांतील फळे जागेवर गळुन पडू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
'लॉकडाऊन'मुळे फळ विक्री नाही; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - farmers lose their fruit crops due to lockdown
शेतकरी शेतात काबाड कष्ट करुन शेतात नवनवीन प्रयोग करुन शेती फुलवतो. यामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा रहातो. यातून शेतकऱ्यांनी माळरानवर हिरव्यागार फळबागा फुलवल्या आहेत. मात्र, याच फळबागा दुष्काळ, अवकाळी पाऊसाच्या शिकार बनला होता. त्यातुनही शेतकरी कसाबसा सावरला. फळबागाही फुलल्या. मात्र, सध्या कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये बाजार समित्या बंद झाल्याने माल विकायचा कुठे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

फळबागांचे झाले नुकसान
'लॉकडाऊन'मुळे फळ विक्री नाही; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान