पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा.. बाजरी पिकाच्या नुकसानीने शेतकरी संकटात - अवकाळी पावसाच्या तडाख्याने बाजरीचे नुकसान
खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यात उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या बाजरी पिकातून कुटुंबाला वर्षभर पुरेल ऐवढे धान्य उत्पादित होऊन जनावरांना मुबलक चारा मिळत असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी बाजरीची लागवड करतात. मात्र, सध्या बाजरी काही ठिकाणी काढणीला आहे, तर काही ठिकाणी दाणे भरत आहेत, अशात अवकाळी पावसाची सुरुवात झाल्याने बाजरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे
![पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा.. बाजरी पिकाच्या नुकसानीने शेतकरी संकटात पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7224682-1015-7224682-1589630296828.jpg)
अवकाळी पावसाने बाजरीचे नुकसान
पुणे- सध्या जनता आणि प्रशासनासह शेतकरी वर्ग कोरोनाचा सामना करत आहे. त्यातच आता खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या पावसामुळे सध्य स्थितीत काढणीला आलेली बाजरी भुईसपाट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासकीय पातळीवरुन वेळेत पहाणी करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी हतबल झालेल्या शेतकरी वर्गातून केली जात आहे.
बाजरी पिकाच्या नुकसानीने शेतकरी संकटात
Last Updated : May 16, 2020, 5:56 PM IST