महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीच्या भेंडीची युरोपात निर्यात, लॉकडाऊनमध्ये दुप्पट दराने विक्री - बारामतीच्या भेंडीची युरोपात निर्यात

पुणे जिल्ह्यातील बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने आपल्या २७ सभासद शेतकऱ्यांकडील सुमारे दीड टन भेंडी युरोपात निर्यात करण्यात यश मिळवले आहे.

organic lady finger
बारामतीच्या भेंडीची युरोपात निर्यात, लॉकडाऊनमध्ये दुप्पट दराने विक्री

By

Published : May 23, 2020, 11:40 AM IST

बारामती- जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोनाने व अवकाळी पावसाने यंदा शेतकऱ्यांना पुरते हैराण करुन सोडले आहे. कोरोनासह अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. मात्र, टाळेबंदीतही बारामतीच्या शेतकऱ्यांच्या विषमुक्त भेंडीला थेट युरोपातून मागणी होत असल्याने निर्यात सुरू करण्यात आली आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करण्यात अनेक समस्या उभ्या ठाकल्या होत्या. अशा संकट समयी पुणे जिल्ह्यातील बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने आपल्या २७ सभासद शेतकऱ्यांकडील सुमारे दीड टन भेंडी युरोपात निर्यात करण्यात यश मिळवले आहे. स्थानिक बाजारात भेंडीला जिथे प्रति किलो १२ रूपये दर सुरू होता. शिवाय भेंडी खरेदीस व्यापारी तयार नव्हते. आशा वेळी आपल्या निर्यातक्षम भेंडीला प्रति किलो २५ रूपये दर मिळवण्यात बारामती तालुक्यातील शेतकरी यशस्वी झाले आहेत.

बारामतीच्या भेंडीची युरोपात निर्यात, लॉकडाऊनमध्ये दुप्पट दराने विक्री
तालुक्यातील मळद व निरावागज येथील शेतकऱ्यांनी २० एकर क्षेत्रात सेंद्रीय करार शेती अंतर्गत विषमुक्त भेंडीची लागवड केली आहे. ही भेंडी तोडणीला आली असतानाच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येथील शेतकऱ्यांवर हतबल होण्याची वेळ आली होती. तसेच टाळेबंदीमुळे या भेंडीची निर्यात करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र दर्जैदार व विषमुक्त उत्पादनामुळे येथील भेंडीला युरोपातून मागणी होऊ लागल्याने आत्तापर्यंत दीड टन भेंडीची निर्यात करण्यात आली आहे. शिवाय स्थानिक बाजार पेठेतील दरापेक्षा दुप्पट दर मिळाला असल्याचे बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे यांनी सांगितले. बारामतीची भेंडी युरोपात पाठविण्यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे, केव्हीकेचे प्रमुख शास्ञज्ञ डॉ. सय्यद शाकीरअली यांनी कसोशीने प्रयत्न केले. तसेच भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे यशंवत जगदाळे, तुषार जाधव, गिरीधर खरात यांचे सहकार्य लाभले.

ABOUT THE AUTHOR

...view details