महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 28, 2019, 10:48 AM IST

ETV Bharat / state

पुण्यातील राजकीय नेते सत्ता गणितात व्यस्त तर दुसरीकडे बळीराजा संकटात...

जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पेठ कुरवंडी, थुगाव, भावडी, पेठपारगाव, कोल्हारवाडी, कुदळवाडी या सातगावांच्या पठार भागावरती अर्थांत सातगाव पठार या परिसरात जवळपास पाच हजार हेक्टरवरती पावसाळ्यात बटाटा हे महत्वाचे पीक घेतले जाते. बटाटा पीकापासून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल याची अशा असते. मात्र, यावर्षी या भागात मुसळधार पावसाने बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय यामुळे बटाट्याचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्म्याने घटले आहे.

राजकीय नेते सत्ता गणितात व्यस्त तर बळीराजा संकटात

पुणे - सध्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे राजकीय नेते प्रचार दौऱयात दंग आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील काबाडकष्ट करणारा बळीराजा संकटात सापडला आहे. उत्तर-पुणे जिल्ह्यातील सातगाव पठार परिसर हा कायमस्वरूपी दुष्काळी परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरातील शेतकरी पावसाळ्यात बटाटा पिकाची लागवड करत असतात. मात्र, यावर्षीच्या अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे बटाटा पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

पुण्यातील राजकिय नेते सत्ता गणितात व्यस्त तर दुसरीकडे बळीराजा संकटात...

हेही वाचा - ऐन सणासुदीच्या व विधानसभा निवडणुकीच्या दिवसांत भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी पुन्हा आक्रमक

जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पेठ कुरवंडी, थुगाव, भावडी, पेठपारगाव, कोल्हारवाडी, कुदळवाडी या सातगावांच्या पठार भागावरती अर्थांत सातगाव पठार या परिसरात जवळपास पाच हजार हेक्टरवरती पावसाळ्यात बटाटा हे महत्वाचे पीक घेतले जाते. बटाटा पीकापासून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल याची अशा असते. मात्र, यावर्षी या भागात मुसळधार पावसाने बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय यामुळे बटाट्याचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्म्याने घटले आहे.

हेही वाचा - पुण्यात आलेला पूर हा अनधिकृत बांधकामांमुळेच - चंद्रकांत पाटील

मोठ्या भांडवली खर्चातून उभे केलेले बटाट्याचे पीक सध्या काढणीसाठी आले आहे. एकीकडे मजूर मिळत नाही तर दुसरीकडे पावसाच्या सरी सुरू आहेत. त्यामुळे बटाट्याची मोठे नुकसान होत आहे
त्यामुळे शेतात केलेली मेहनत आणि भांडवली खर्च पाहता या वर्षी बटाट्याचे पीक हे शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याची भीती बळीराजा व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे मात्र, राजकीय मंडळी सत्ता गणितात व्यस्त असल्याने त्यांना या बळीराजाच्या या संकटाशी काही देणे-घेणे आहे की नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details