महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीकविम्याच्या पैशासाठी बीडच्या शेतकऱ्यांचे पुण्यात आंदोलन, खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय जाणार नसल्याचा इशारा

शेतकऱ्यांनी कागदपत्रांच्या पुर्ततेसह मुदतीच्या आत पिकविम्याचा प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने पीकविमा कंपनीकडे सादर केला होता. सोयाबीनसह इतर पिकांना विमा मंजूर होऊन काही शेतकऱ्यांच्या खात्यात तो जमाही झाला. मात्र, नियमांवर बोट दाखवत काही शेतकऱ्यांना पीकविमा नाकारण्यात आला. त्यामुळे वैतागून 200 ते 250 बुधवारी सकाळपासून त्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली. जोपर्यंत खात्यावर पीकविमा जमा होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे.

पीकविम्यासाठी आंदोलन करताना शेतकरी

By

Published : Nov 13, 2019, 5:47 PM IST

पुणे - येथे 2018 साली मंजूर झालेला खरीप पीकविमा अद्याप न मिळाल्यामुळे बीड जिल्ह्यातील 200 ते 250 शेतकऱ्यांनी पुण्यातील शिवाजीनगर येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीसमोर बुधवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरू केले. बीड जिल्ह्याच्या विविध गावातून आलेल्या या शेतकऱ्यांनी जोपर्यंत पीकविम्याची रक्कम आमच्या खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत येथून हलणार नसल्याचे सांगितले.

पीकविम्यासाठी आंदोलन करताना शेतकरी

या शेतकऱ्यांनी कागदपत्रांच्या पुर्ततेसह मुदतीच्या आत पीकविम्याचा प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने पीकविमा कंपनीकडे सादर केला होता. सोयाबीनसह इतर पिकांना विमा मंजूर होऊन काही शेतकऱ्यांच्या खात्यात तो जमाही झाला. मात्र, नियमांवर बोट दाखवत काही शेतकऱ्यांना पीकविमा नाकारण्यात आला. या शेतकऱ्यांना IFSC कोड चुकीचा भरला, बँक खात्याचा क्रमांक चुकीचा दिला, सातबाऱ्यावरील जमिनीपेक्षा जास्तीचा विमा घेतला यामुळे विमा नाकारण्यात आल्याचे कारण सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी मात्र संगणक ऑपरेटरच्या चुकीमुळे IFSC कोड आणि बँक खातेक्रमांक चुकल्याचे सांगितले.

हेही वाचा -ऑनलाईन बिंगो मटक्यावर छापा; बारामती क्राईम ब्रँचची कारवाई

किसानसभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सदस्य अॅड. अजय बुरांडे म्हणाले, मागच्या ४ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाला पण अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. अशा सर्व बाजूनी संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांची पीकविम्याची हक्काची रक्कम देण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी टाळाटाळ करीत आहे. आम्ही वारंवार कंपनीतील अधिकाऱ्यांना भेटलो, निवेदनं दिली. यावेळी आम्हाला फक्त आश्वासनं दिली गेली पण अजूनही पीकविमा आम्हाला मिळाला नाही.
परळी तालुक्यातील गडदेवाडी येथून आलेले शेतकरी वसंतराव गडदे म्हणाले, 2017-18 आणि 19 या ३ वर्षांचा विमा अजूनही मिळालेला नाही. आम्ही वेळेत ऑनलाईन विमा भरला होता, त्याच्या पावत्याही आहेत. पण चूका झाल्याचे सांगत आम्हाला विमा नाकारण्यात आलला. आम्ही परत ते लिहून दिलं, पण कंपनी काही ऐकत नाही. दुष्काळ असताना आम्हाला रुपयाही मिळाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तर इतर शेतकऱ्यांनीही अशाच प्रकारची तक्रार केली आहे.

हेही वाचा - त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त एक लाख दिव्यांनी सजले दगडूशेठ गणपती मंदिर

त्यामुळे या सर्वांना वैतागून 200 ते 250 शेतकरी परळीहुन रात्री रेल्वेने पुण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळपासून त्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली. जोपर्यंत खात्यावर पीकविमा जमा होत नाही, मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही. तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे.
हेही वाचा - शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार; संजय राऊतांचा विश्वास कायम

ABOUT THE AUTHOR

...view details