पुणे -राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर कृती करणारे कार्यकर्ते आपण पाहिले आहेत. मात्र, आपल्या नेत्याला भाजीपाला मिळावा यासाठी एका शेतकऱ्याने थेट २०० किलोमीटर अंतर दुचाकीवरून पार करीत मुंबई गाठली. त्याठिकाणी सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन त्याने शरद पवारांना भाजीपाला दिला. पवारांनी देखील ट्विटच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याचे कौतुक केले.
...म्हणून शेतकरी २०० किलोमीटर अंतर कापून थेट पोहोचला 'सिल्वर ओक' बंगल्यावर - शेतकरी भाजीपाला घेऊन सिल्वर ओकवर
पुण्यातील तरुण शेतकरी भाजीपाला घेऊन शरद पवारांना भेटायला गेला. पवारांनी भाजीपाला स्वीकारत त्याचे कौतुक केले.
![...म्हणून शेतकरी २०० किलोमीटर अंतर कापून थेट पोहोचला 'सिल्वर ओक' बंगल्यावर farmer sunil sukre story](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5221290-thumbnail-3x2-pune.jpg)
सुनील सुक्रे, असे या शेतकरी तरुणाचे नाव आहे. तो जिल्ह्यातील केंदूर गावचे रहिवासी आहे. शेतकरी अडचणीत असताना शरद पवार धाऊन येतात. त्यामुळे त्यांना आपल्या शेतातील हिरवा भाजीपाला नेऊन द्यावा. त्यामुळे मी भाजीपाला घेऊन गेलो असल्याचे सुक्रे या शेतकऱ्याने सांगितले. यावेळी सिल्वर ओक बंगल्यावर राजकीय घडामोडी सुरू असताना शरद पवार त्याला भेटले. तसेच त्यांनी आणलेला भाजीपाला स्वीकारला. तसेच त्याचे फोटो ट्विटरवर टाकून त्याचे कौतुक केले. त्याठिकाणी त्याला जितेंद्र आव्हाड देखील भेटले. त्यांनी देखील त्या शेतकऱ्याचे कौतुक केले. त्यानंतर शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन देखील पवारांनी यावेळी दिले.
हे वाचलं का? - शेतीला व्यवसायाची जोड, कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना मिळतेय आर्थिक स्थैर्य