पुणे Farmer Success Story :शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतो. शेतात आलेला माल बाजारात नेतो. परंतु, कधी मालाला भाव मिळत नाही. बऱ्याचदा उत्पादन खर् देखील निघत नसल्याने तो माल फेकून द्यावा लागतो. त्यातच टोमॅटो अन् कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच या संकटांना सामोरं जावं लागतं. परंतु, यंदा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत. कधी नव्हे असा भाव टोमॅटोला गेल्या काही दिवसात मिळालायं. यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी टोमॅटो लागवडीमुळे लखपती झालायं. (Pune Farmer Story)
वडिलोपार्जित जमिनीवर टोमॅटोची लागवड : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भागडी गावात गोपाळ लक्ष्मण गवारे यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर टोमॅटोची लागवड केली होती. यात त्यांना लाखोंचा फायदा झालाय. गवारे कुटुंब हे 1994 सालापासुन टोमॅटोची लागवड करतंय. त्यापूर्वी गवारे कुटुंब शेतात ऊसाची लागवड करत होते. मात्र 1994 ते 97 सलापर्यंत त्यांनी शेतात टोमॅटो आणि झेंडूचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. सुरवातीला त्यांनी 2 ते 3 एकरातच टोमॅटोचे पीक घेतले. यात त्यांना चांगला भावदेखील मिळाला होता. त्यानंतर मंदी आल्यानं त्यांनी टोमॅटोचं पीक घेम कमी केलं. त्यानंतर 2006 पासून 10 एकर जमिनीची मशागत करून त्यांनी पुन्हा टोमॅटो लावायला सुरवात केली. यानंतर त्यांनी आतापर्यंत 20 एकर शेतात टोमॅटोची लागवड केलीयं. तर इतर ठिकाणी झेंडूच्या फुलांची लागवड केलीयं. त्यातच यावर्षी टोमॅटोला चांगला बाजार भाव मिळाल्याने त्यांना मोठा फायदा झालायं.
झेंडूच्या शेतीतून लाखोंचं उत्पन्न :गेल्या 20 वर्षांपासून गवारे कुटुंब फुलांची शेती करतयं. (Marigold flower) गवारे कुटुंबीयांकडून सणाच्या काळात शेतीत झेंडूच्या फुलांची शेती केली जाते. यावर्षी सात एकरात त्यांनी 36 हजार झेंडूच्या फुलाचे रोपं लावली होती. अशातच सध्या बाजारात झेंडूंच्या फुलांना चाळीस रुपये किलोपर्यंत भाव मिळतोय. आतापर्यंत सात एकर मध्ये लावलेल्या झेंडूच्या फुलाचे 35 टन माल झाला आहे. यातून देखील दहा लाखाचं उत्पन्न आतापर्यंत झालयं. मात्र झेंडूच्या फुलांना सध्या मागणी नसल्यामुळे भाव मिळत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात सण आणि उत्सव असल्याने झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्यानंतर भाव अपेक्षित मिळेल. त्यातून जास्त 5 ते 10 लाख रुपये नफा मिळेल अशी अपेक्षा गवारे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. टोमेटोसह झेंडूमधून त्यांना तीन महिन्यात सुमारे 1 कोटी 20 लाखांचे उत्पन्न मिळालंय.
टोमॅटोच्या विक्रीमुळे लाखोंचा नफा :गेल्या महिन्याभरापासून टोमॅटोच्या दरांनी केलेली शेकडोंची उड्डाणे सामान्यांना मेटाकुटीला आणण्यासाठी पुरेशी ठरली आहेत. कधी गॅस, कधी कांदे, कधी डाळींमुळे हवालदील होणारा सामान्य ग्राहक सध्या टोमॅटोमुळे मेटाकुटीला आलाय. एकीकडं ग्राहकांची ही अवस्था असताना दुसरीकडे महाराष्ट्रात एका शेतकऱ्यानं टोमॅटोच्या विक्रीमुळे लाखोंचा नफा कमावल्याचं समोर आलयं. यामुळं टोमॅटोच्या दरांमुळे सामान्यांना आर्थिक भार सोसावा लागत असला, तरी दुसरीकडे बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळत असल्याचीही भावना व्यक्त होतंय.
हेही वाचा:
- Tomato Price : आता एक टोमॅटो मिळतोय 20 रुपयांना; प्रति किलोचा दर जाणून बसेल धक्काच
- Nashik Onion Subsidy : नाशिक जिल्ह्यात कांदा अनुदानासाठी 1 लाख 72 हजार शेतकरी पात्र; 453 कोटी 61 लाखांचं लवकरच होणार वाटप
- Tomato Farmer Crorepati : लाल टोमॅटोमुळे शेतकरी झाला मालामाल! टोमॅटो विकून कमावले करोडो रुपये!