पुणे - सध्या कांद्याचे बाजारभाव गगणाला भिडल्याने शेतकरी सुखावला आहे. चाळीत साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाजारात नेण्याची लगबग सुरू आहे. अशातच जुन्नर तालुक्यातील रोहकडी येथील शेतकरी नामदेव गंगाराम घोलप, कमल सदाकाळ व रावसाहेब घोलप या शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कांदा चाळीत अज्ञात समाजकंटकाने युरिया टाकल्यामुळे कांदा खराब होऊन लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
सध्या बाजारात कांद्याला अच्छे दिन आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, असा प्रकार घडू लागल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात समाजकंटकांकडून असे प्रकार घडू लागल्याने शेतकऱ्यांना रात्रदिवस कांदा चाळीचे रक्षण करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.