पुणे - पुण्यातील मार्केट यार्डात शेतकऱ्यास मारहाण तसेच शेतकरी लुटीच्या घटनेत वाढ होताना दिसते आहे. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात सोमवारी आपला शेत माल विकण्यासाठी एक शेतकरी आलेला होता. माल विकल्या नंतर सोमवारी मध्यरात्री शेतकऱ्याला दोन तीन जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली. तसेच त्याच्या कडील पैसे लुटल्याची घटना घडली.
पुण्यात मार्केटयार्डमध्ये शेतकऱ्याला मारहाणसह लूटमार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - Farmer beaten by unknown peoples
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात सोमवारी आपला शेत माल विकण्यासाठी एक शेतकरी आलेला होता. माल विकल्या नंतर सोमवारी मध्यरात्री शेतकऱ्याला दोन-तीन जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली.
पुण्यात मार्केटयार्ड मध्ये शेतकऱ्याला मारहाण
ही सपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मार्केटयार्डात शेतकरी सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. मारहाण झालेला शेतकरी हा नगर जिल्ह्यातील कोतुळ गावातील आहे. भानुदास देशमुख असे या शेतकऱ्यांचे नाव असून या संदर्भात मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.