मावळ (पुणे)Family Beaten Up In Maval:माझ्या मुलाचे निधन झाले आहे. त्यामुळे माझ्या घरासमोरून गणपतीची मिरवणूक जाताना डिजे वाजवू नका, असे कुटुंबाच्या सदस्यांनी म्हटल्याने २१ जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली आहे. ही घटना सोमवार, २५ सप्टेंबर रोजी घडली आहे. याबाबत सुनील प्रभाकर शिंदे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
'या' आरोपींना अटक:या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी २१ जणांना अटक केली आहे. यामध्ये सुनील बंदा रजपूत (वय २८), मुकेश करसन रजपूत (२६), रवी करसन रजपूत (३०), सनी करसन रजपूत (३२), प्रवीण करसन रजपूत (३०), अक्षय ज्ञानेश्वर काकडे (२८), अतुल वेलसी रजपूत (२१), कृष्णा बलभीम खराते (२३), रवी हिरा रजपूत (२८), संदीप रमेश रजपूत (२९), विशाल काळुराम रजपूत (२९), संतोष काळुराम रजपूत (२५), विलास हिरा रजपूत (२२), अनिल हिम्मत रजपूत (३१), करसन जयंती रजपूत (५०), दीपक हिम्मत रजपूत (३२), आकाश अशोक रजपूत (२१), काळुराम भिका रजपूत (५५), वसंत भिका रजपूत (५१), अमित वेलसी रजपूत (२४) आणि रमेश जयंती रजपूत (५०, सर्व रा. शिंदेवस्ती, सोमाटणे फाटा) यांना अटक करण्यात आली आहे.
डिजे बंद केल्याचा राग 'असा' काढला:पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील शिंदे यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखाच्या सावटाखाली होते. त्यामुळे मुलाच्या दुःखाच्या वेदना त्यांना सहन होत नव्हत्या. गणपतीचे दिवस असल्याने त्यांच्या घरासमोरून गणपतीची मिरवणूक चालली होती. तेव्हा त्या कुटुंबातील व्यक्तीने मिरवणुकीतील काही व्यक्तींना सांगितले की, माझ्या मुलाचे निधन झाले आहे. त्यामुळे माझ्या घरासमोर डीजे वाजवू नका, पुढे जाऊन वाजवा असे त्यांना सांगितले. त्यानंतर आरोपींनी डिजे वाजवणे बंद केले. मात्र, डिजे बंद करायला लावल्याचा राग त्यांच्या मनात होता. त्यावेळी गणपती विसर्जन करून परत जाताना आरोपींनी सुनील शिंदे आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने घरावर हल्ला करून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा:
- Pune Murder News : खून करून पोलीसांनी पकडू नये म्हणून आरोपीनं लढविली अनोखी शक्कल; पाहून पोलीसही चक्रावले
- Theft Nalanda Hospital : पाच वर्षे रुग्णालयात घेतले मोफत उपचार, अचानक रुग्णानं मृतदेहावरचे चोरले दागिने
- Nashik Crime : कांद्याच्या गोणीत आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह; खून करुन मृतदेह फेकल्याचा पोलिसांना संशय