पुणे- चाकण-तळेगाव रस्त्यावरील खालुंब्रे गावात ह्युंदाई चौकात पाऊस सुरू असताना रस्त्यावरुन जाणाऱ्या गाड्यांवर जुने वडाचे झाड पडल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमाराम घडली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या कार व टेम्पोवर हे झाड कोसळल्याने त्या दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. झाड पडण्याच्या घटनेचा थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
चाकण-तळेगाव रस्त्यावर वडाचे झाड कोसळले, घटना सीसीटीव्हीत कैद - tree fall
झाड पडण्याच्या घटनेचा थरार सीसीटिव्ही कँमेरात कैद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झालेली नाही
झाड पडले
चाकण-तळेगाव रोडवरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असते. सध्या पाऊसामुळे खालुंब्रे येथून वाहतूक कोंडी झाली असताना अचानक वडाचे झाड दोन वाहनांवर पडले. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
झाड पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. महाळुंगे पोलिसांकडून वाहतूक कोंडी फोडण्यात आली.