बारामती (पुणे) -शहरातील औद्योगिक वसाहतीमधील भूखंड स्वतःच्या मालकीचा व्हावा यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नावाचे बनावट शिफारस पत्र तयार करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल गुलमोहम्मद शेख (रा. बारामती क्लब रोड, बारामती) असे आरोपीचे नाव आहे.
सलीम फकीर महंमद बागवान (वय ५५,रा.कचेरी रोड बारामती ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सोहेल शेखविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गतवर्षी हा प्रकार झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सोहेल शेख यांच्या सासऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. सोहेल व त्यांच्या सासऱ्यातील वाद मिटविण्याकामी तक्रारदाराने पुढाकार घेतला होता. या कामी सोहेल याने तक्रारदाराची भेट घेतली असता, सासऱ्यांनी दिलेले पत्र तक्रारदाराने सोहेल याला दाखविले. त्याने मूळ पत्र सादर करत उद्योगमंत्र्यांनी बारामती एमआयडीसीतील भूखंड माझ्या नावे होण्याची शिफारस केली असल्याचे सांगितले.
मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याला बनावट पत्राविषयी दिली माहिती