महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरुर आरोग्य विभागाचा अजब कारभार, बोगस डॉक्टर अटक असतानाही दिले हॉस्पिटलच्या नावे रेमडेसिवीर - मेहमूद शेख डॉक्टर अटक न्यूज

पुणे जिल्ह्यातील शिरुर आरोग्य विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही. अशातच कारेगाव येथील बोगस डॉक्टरवर केलेल्या कारवाईत मोरया हॉस्पिटल सील करण्यात आले. तर याच हॉस्पिटलच्या नावे आरोग्य खात्याने सहा रेमडेसिवीर इंजेक्शनचे जिल्हाधिकारी व आरोग्य खात्याकडून वाटप करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत बोलण्यासाठी सर्वांनी टाळाटाळ केली आहे.

Shirur
Shirur

By

Published : Apr 26, 2021, 3:55 PM IST

शिरुर - पुणे जिल्ह्यातील शिरुर आरोग्य विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही. अशातच कारेगाव येथील बोगस डॉक्टरवर केलेल्या कारवाईत मोरया हॉस्पिटल सील करण्यात आले. तर याच हॉस्पिटलच्या नावे आरोग्य खात्याने सहा रेमडेसिवीर इंजेक्शनचे जिल्हाधिकारी व आरोग्य खात्याकडून वाटप करण्यात

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील श्री मोरया मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले. मेहमूद शेख असे बनावट डॉक्टरचे नाव आहे. तो महेश पाटील असे नाव सांगून हॉस्पिटल चालवत होता. कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये आयसीयू व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेड वरती २२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण उपचार घेत होते. पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून बनावट डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले. मात्र, असे असतानाही या हॉस्पिटलच्या नावाने रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यात आल्याचे समोर आले आहे. या संदर्भात आरोग्य विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, कोणीही या विषयावर बोलण्यास किंवा प्रतिक्रिया देण्यास समोर आले नाही. प्रत्येकाने टाळाटाळ केली.

ABOUT THE AUTHOR

...view details