पुण्याच्या किरकटवाडी परिसरातून तोतया लष्करी अधिकारी अटकेत - अंकित कुमार सिंह तोतया
पुण्याच्या किरकटवाडी परिसरातून तोतया लष्करी अधिकाऱ्याला अठक केली आहे. तो मुळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून वेगवेगळी दहा बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
तोतया लष्करी अधिकारी अटकेत
पुणे- भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल असल्याचे भासवून नागरिकांना फसवणाऱ्या एका तोतयाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. पुण्याच्या किरकिटवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. अंकित कुमार सिंह (वय 23 सध्या राहणार उत्सव सोसायटी किरकट्वाडी मूळ राहणार हसनपूर, आमरोह, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या तोतयाचे नाव आहे.