महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फडणवीसांनी राज्यासाठी केंद्राकडे मदत मागावी - रोहित पवार - बारामती लेटेस्ट न्यूज

नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने गुजरात, महाराष्ट्रासह अन्य दोन राज्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र असे असताना देखील पंतप्रधानांनी केवळ गुजरातलाच मदत जाहीर केली आहे. केंद्राने इतर नुकसानग्रस्त राज्यांना देखील मदत द्यावी. आम्हाला आशा आहे की, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवीस महाराष्ट्राला मदत करण्याबाबत केंद्राला पत्र पाठवतील, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार
रोहित पवार

By

Published : May 23, 2021, 5:38 PM IST

बारामती - नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने गुजरात, महाराष्ट्रासह अन्य दोन राज्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र असे असताना देखील पंतप्रधानांनी केवळ गुजरातलाच मदत जाहीर केली आहे. आम्हाला आशा आहे की, केंद्र सरकार गुजरात प्रमाणेच इतर नुकसानग्रस्त राज्यांना देखील मदत करेल. महाविकास आघाडी सरकार बरोबरच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला आहे. त्यामुळे केंद्राने राज्याला मदत करावी अशा मागणीच पत्र फडणवीस केंद्राला पाठवतील अशी अपेक्षा असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. ते बारामतीमध्ये बोलत होते.

फडणवीसांनी राज्यासाठी केंद्राकडे मदत मागावी

'केद्र सरकारला नियोजन करता आले नाही'

जगावर कोरोनाचे संकट असताना, देशात दररोज 4 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत असताना, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या. तसेच यावेळी विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. देशाला लसीकरणाची गरज असताना लसीचा तुटवडा निर्माण झाला. याचाच अर्थ असा होतो की, केंद्र सरकार नियोजन करण्यात कमी पडले आहे, अशी टीका देखील यावेळी रोहित पवार यांनी केली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा आहे. असे असताना केंद्र सरकारच्या मालकीची तामिळनाडू येथील लस निर्मिती कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे. या कंपनीत महिन्याला ५ तर वर्षाला ६० कोटी लस उत्पादन करण्याची क्षमता आहे. लसीचा तुटवडा पाहता केंद्र व राज्य सरकारांनी समन्वय साधून ही कंपनी पुन्हा सुरू करावी.

हेही वाचा -देशात गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ४० हजार नव्या रुग्णांची नोंद; ३,७४१ बळी

ABOUT THE AUTHOR

...view details