पुणे :पुण्यातील एका ३३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाला सेक्स्टॉर्शनमध्ये अडकवून त्याच्याकडून 7 लाख 14 हजार रुपये उकळल्याची घटना घडली आहे. तो आंबेगाव या भागात राहतो. या तरुणाला एका महिलेचा व्हिडीओ कॉल आला. कॉल चालू असताना तिने आपल्या अंगावरचे कपडे उतरवले. ते पाहात असल्याचे स्क्रीन शॉट या महिलेने काढले. हे स्क्रीन शॉट व व्हिडीओ त्याच्या मित्रांना पाठविण्याची तिने धमकी दिली. त्यानंतर दिल्ली सायबर कमिशन श्रीवास्तव बोलत आहे, असे त्याला फोन आले. पोलिसांना तपास करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगून त्या महिलेने फिर्यादीकडून वेळोवेळी 7 लाख 14 हजार 424 रुपये उकळले आहे. शेवटी या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली असून अधिक तपास पोलीस करत आहे.
कशी होते फसवणूक :साधारणतः हा आपल्याला आपल्या व्हॉट्सॲपवर एका नंबरवरून सुंदर मुलीचे फोटो येतोत. त्यांनतर हळूहळू ओळख केली जाते. समोरून आग्रह केला जातो की, व्हिडियो कॉलवर बोलूया. त्यानंतर जेव्हा व्हिडियो कॉल केला जातो. तेव्हा समोर असलेली मुलगी न्यूड होते. ती आपल्याला ही न्यूड होण्याबाबत आग्रह करते. चेहरा कॅप्चर करण्यासाठी दोन मिनिटांचा व्हिडियो कॉल केला जातो. लगेच व्हॉट्सॲपवर त्या व्हिडियो कॉलचा व्हिडियो येतो. तेथून धमक्यांना सुरवात होते. पहिल्यांदा अशी धमकी दिली जाते की जर आपण पैसे नाही दिले तर मी तक्रार दाखल करेल, अन्यथा सोशल मीडियावर व्हायरल करेल. याच धमकीला तरुण बळी पडतात, पैसे देतात. जर पैसे दिले गेले नाही तर सोशल मीडियावर व्हायरल केले जातील. बदनामी होऊ नये म्हणून तरुण टोकाचे पाऊल उचलतात.
मागच्या वर्षभरात सेक्सटॉर्शनचे 1400 अर्ज :पुणे सायबर पोलिसांकडे सेक्सटॉर्शनचे 1400 हून अधिक अर्ज आले आहेत. पोलीस याचा तपास करत आहे. आमच्याकडे अर्ज घेऊन आलेल्या व्यक्तीकडून पूर्ण माहिती घेतली जाते. त्याला समजावून सांगितले जाते की, कोणत्याही प्रकारचे पैसे भरू नये. पॅनिक होऊ नये. कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. जर अर्जदाराने पैसे भरले असेल तर बँक डिटेल घेऊन तशी चौकशी केली जाते. तसेच व्हॉट्सॲप वरून माहिती घेऊन पुढील तपास केला जात आहे.