पुणे : गुन्हा दाखल केलेल्या आरोपी मध्ये Adv. विक्रम भाटे (वय ३४, रा. हडपसर) आणि वैभव शिंदे (वय ३४) अशी त्यांची नावे आहेत. आरोपी वकिलाने काही व्यावसायिकांना हनी ट्रॅपमध्ये फसवून बलात्काराची केस करण्याची धमकी देत त्यांच्याकडून 17 लाखांची खंडणी वसूल केल्याची माहिती समोर आली आहे. हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. उद्योजकाच्या मैत्रिणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जून 2021 ते 25 जानेवारी 2023 दरम्यान वाघोलीत हा प्रकार हा घडला.
तरुणीवर केला बलात्कार: पोलिसांचा माहितीनुसार फिर्यादी हिची वैभव शिंदे, Adv. विक्रम भाटे यांच्याशी ओळखी आहे. ते दोघे फिर्यादीच्या घरी आले. कोल्ड्रींकमध्ये घातक पदार्थ मिसळून तिला पिण्यास आग्रह केला. यानंतर दोघांनी आळीपाळीने तिच्याशी शारीरिक संबंध केला. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचे नकळत व्हिडिओ चित्रिकरणही केले. ते फिर्यादीला दाखवून तिला दुसऱ्या व्यक्तींबरोबर शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. आरोपींनी या प्रसंगाचे चित्रिकरण करून त्या व्यावसायिकांनाही लुबाडले. हडपसरमधील व्यापाराला असेच फिर्यादीला हनी ट्रॅपमध्ये फसविण्यास सांगितले होते. मात्र तो मित्र असल्याने तसे करण्यास फिर्यादीने नकार दिला.