महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्वच पक्षांत उफाळून आलेली बंडखोरी काही प्रमाणात शमवण्यात राजकीय चाणक्यांना यश - कसबा मतदारसंघ

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रमुख लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वच पक्षांत उफाळून आलेली बंडखोरी काही प्रमाणात शमवण्यात राजकीय चाणक्यांना यश आले आहे. मात्र, काही बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.

शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक विशाल धनवडे

By

Published : Oct 7, 2019, 11:13 PM IST

पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रमुख लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील 21 मतदारसंघात सर्वच पक्षांत उफाळून आलेली बंडखोरी शमवण्यात राजकीय चाणक्यांना यश आले आहे.

उफाळून आलेली बंडखोरी काही प्रमाणात शमवण्यात राजकीय चाणक्यांना यश


पुणे शहरात एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेकडून पाच मतदारसंघात बंडखोरी करण्यात आली होती. कसबा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक विशाल धनवडे यांचा अपवाद वगळता खडकवासला, हडपसर, वडगावशेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंटमधील बंडखोरांनी माघार घेतली आहे.
सेनेचे कसब्यातील बंडखोर विशाल धनवडे यांनी मात्र, कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आणि कसब्यावर भगवा फडकवल्यानंतरच मातोश्रीवर पाय ठेवणार, असा निश्चय केला आहे.

हेही वाचा - पुणे खेडशिवापूर येथे गोदामाला मोठी आग

पुणे शहरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर ब्राम्हण महासंघाने त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला. मात्र, ब्राम्हण महासंघाचे हे आव्हान पेल्यातले वादळ ठरले. ब्राम्हण महासंघाने कोथरूडमधून आपला उमेदवार मागे घेतला आहे.
काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात पर्वतीमधून तर कमल व्यवहारे यांनी कसबामधून माघार घेतली आहे. काँग्रेसच्याच सदानंद शेट्टी यांनी पुणे कॅन्टोन्मेंटमधून केलेली बंडखोरी मागे घेतली आहे.

हेही वाचा - पुणे महापालिकेसमोर पाण्यासाठी महिलांचा हंडा गरबा; मोकळ्या हंड्यानी खेळला दांडिया

इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या आप्पा जगदाळे यांनी उमेदवारी मागे घेतली. मात्र, त्यांनी भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठींबा दिल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीला शिरूर मतदारसंघात ही अशाच प्रकारचा धक्का बसला आहे. शिरूरमधून प्रदीप कंद यांनी माघार घेतली असली, तरी त्यांनी भाजप उमेदवाराला पाठींबा जाहीर केला आहे. खेड-आळंदी मतदार संघात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details