पुणे :महायुद्धात सैनिकांनी वापरलेल्या दुर्बिणी, त्यांचे मेडल्स, टोप्या आणि पोषाख तसेच एक मिली ग्रॅमच्या सोन्याच्या गणपतीची रूपे अशा वैविध्यपूर्ण वस्तूंचा खजिना पुणेकरांसाठी खुला झाला ( Exhibition of antiques ) आहे. पुण्यातील बालगंधर्व कलादालनात इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमसतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्मिळ वस्तुंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात ( International Collectors Society of Rare Items ) आले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकर नागरिक गर्दी करत आहे.
Exhibition of antiques : दुर्मिळ वस्तूंचा आकर्षक खजिना खुला; प्रदर्शनाला नागरिकांची गर्दी - Pune residents flock exhibition
हायुद्धात सैनिकांनी वापरलेल्या दुर्बिणी, त्यांचे मेडल्स, टोप्या आणि पोषाख तसेच एक मिली ग्रॅमच्या सोन्याच्या गणपतीची रूपे अशा वैविध्यपूर्ण वस्तूंचा खजिना पुणेकरांसाठी खुला झाला ( Exhibition of antiques ) आहे.
15 हून अधिक दुर्मिळ साहित्यांचे स्टॉल :संस्थेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनात पुण्यासह राज्याच्या अन्य भागातील विविध संग्राहकांनी त्यांच्याकडील दुर्मिळ वस्तूंचा खजिना मांडला आहे. यामध्ये बॉटल ओपनर, वेगवेगळे लाकूड आणि धातूंपासून बनविलेल्या आजोबांच्या काठ्या, शंख शिंपले, कोरल्स, राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या नोंद घेण्याजोग्या घटनांची जसे की, माणूस चंद्रावर उतरला, भारताने जिंकलेला क्रिकेट विश्वचषक, अशा महत्त्वपूर्ण घटनांची साक्ष देणारी ५० ते १०० वर्षांपूर्वीची जुनी वृत्तपत्रे, दिग्गजांच्या स्वाक्षरीवरून मधुसुदन घाणेकर यांनी केलेला त्या दिग्गजांच्या स्वभाव विश्लेषणाचा संग्रह, तसेच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिवंगत नामवंतांच्या स्वाक्षऱ्यांचा गजानान पटवर्धन यांनी केलेला संग्रह, जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून जमवलेले चहा-कॉफीचे मग अशा वैविध्यपूर्ण दुर्मिळ वस्तूंचा खजिना रसिकांसाठी खुला झाला ( Pune residents flock exhibition ) आहे.
कलादालनात आयोजित प्रदर्शन :बालगंधर्व कलादालनात आयोजित हे प्रदर्शन रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत सकाळी दहा (१०.००) ते सायंकाळी सात (०७.००) या वेळेत रसिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक तसेच लहान मुलांकडून मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जात आहे.