पुणे : शिवनेरी किल्ल्यावर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित शिवजन्म सोहळा पार पडला. त्यामुळे शिवनेरीवर आलेल्या शिव भक्तांना शिवनेरी किल्ल्याच्या शिवाई देवी मंदिराच्या इथ थांबविण्यात आले असून शासकीय कार्यक्रम सुरू असल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे शिवभक्त आक्रमक झाले असुन शिवभक्तांकडून जोरदार घोषणाबाजी करत मुख्य कार्यक्रम थांबविण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी राजे आक्रमक :यावेळी प्रशासनाच्या कारभारावर माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे देखील आक्रमक झाले होते. मुख्य कार्यक्रम काही वेळ थांबविण्यात आले होते. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की मी दरवर्षी हेलिकॉप्टर नव्हे तर पायी गडावर येऊन शिवजयंती साजरा करत असतो.असा टोला यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.
शासकीय कार्यक्रमाचा निषेध :शिवनेरीवर किल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. तसेच शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार त्यांनी बहिष्कार टाकला आहे. असंख्य कार्यकर्त्यांसह भगवा ध्वज जाणीव आंदोलन सुरू करत पायी शिवनेरीवर भगवा झेंडा घेऊन आले होते. यावेली त्यांनी प्रकारांशी संवाद साधत शासकीय कार्यक्रमाचा निषेध नोंदवला.