महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुरुषांनीही महिलांच्या कर्तृत्वाची शान सांभाळणे, ती जपणे हा पुरुषार्थच - उपजिल्हाधिकारी शिर्के - पुणे आंबेगाव अभिनव महाविद्यालय न्यूज

आंबेगाव येथील अभिनव महाविद्यालयाच्या संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी लढण्यासाठी समविचारी महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'कर्तव्यनिष्ठ महिला मंचा'चा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी, उपजिल्हाधिकारी गीतांजली शिर्के, सहायक पोलीस उपायुक्त पौर्णिमा तावरे, तहसीलदार अर्चना निकम, संस्थापक राजीव जगताप, संस्थेच्या सर्व विभागांचे प्राचार्य

Pune Ambegaon Abhinav college News
पुणे आंबेगाव अभिनव महाविद्यालय न्यूज

By

Published : Mar 7, 2021, 5:47 PM IST

पुणे - 'स्त्रियांमधील कलागुण कौशल्य ओळखणे, त्याला साथ देणे, त्याला वाढवणे याबरोबरच त्यांच्यामधील कर्तृत्वाची शान सांभाळून ती जपणे हा पुरुषार्थच आहे, हे पतींनी पुरुषांनी लक्षात घ्यावे,' असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी गीतांजली शिर्के यांनी केले. त्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

पुणे आंबेगाव अभिनव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
आंबेगाव येथील अभिनव महाविद्यालयाच्या संकुलामध्ये महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी लढण्यासाठी समविचारी महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'कर्तव्यनिष्ठ महिला मंचा'चा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी, सहायक पोलीस उपायुक्त पौर्णिमा तावरे, तहसीलदार अर्चना निकम, संस्थापक राजीव जगताप, संस्थेच्या सर्व विभागांचे प्राचार्य, शिक्षक त्याचबरोबर शाळेच्या माजी विद्यार्थिनी मिसेस इंडिया नीलम टाटीया-पवार, आयुर्वेद वैद्य डॉ. नम्रता नेवसे, डॉ. क्रांती जगताप आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला.तुम्ही स्त्री आहात म्हणून मागे पडू नका

पोलीस उपायुक्त पौर्णिमा तावरे म्हणाल्या, 'तुम्ही एक स्त्री आहे, म्हणून मागे पडू नका. तुमच्यातील बळ आणि जी क्षमता आहे, त्याच्या जोरावर तुम्ही तुमच्या कुटुंबाला खंबीर पाठबळ द्या.'

स्त्रियांचे आरक्षण ३३ टक्क्यावरून ५० टक्के होण्यासाठी झटले पाहिजे

राजीव जगताप म्हणाले की, 'स्त्री आणि पुरुष यांना समान मानले तर, स्त्रियांचे आरक्षण ३३ टक्क्यांवरून ५० टक्के होण्यासाठी झटले पाहिजे.' अभिनवच्या वडवडी, भोर येथील डिप्लोमा इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पंचक्रोशीतील मुलींना मोफत वसतिगृह आणि शिक्षण देऊन मी महिलांसाठी उन्नतीसाठी खारीचा वाटा उचलत आहे. त्याचा मला अभिमान आहे. यावेळी माजी विद्यार्थिनींनी शाळेने दिलेले संस्कार, शिस्त, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन जीवनामध्ये उपयोगी पडले यासाठी शाळेचे आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details