पुणे - चार दिवसांपासून कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. मात्र, राजगुरूनगर शहरात भाजीपाला, किराणा आणि इतर वस्तू खरेदीसाठी नागरिकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. एकीकडे गर्दी करू नका, असे आवाहन पोलीस करत असूनही नागरिक तुडुंब गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊनमध्येही राजगुरुनगरात नागरिकांची गर्दी - pune police news
राज्यासह देशात लॉकडाऊन आहे, तरी राजगुरूनगर शहरातील भाजीपाल, किराणा आणि इतर वस्तू खरेदीसाठी नागरिक तुडुंब गर्दी करताना दिसत आहेत. राजगुरूनगर नगरपरिषदेच्या माध्यमातून गर्दीवर उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र दिसत आहे.
लॉकडाऊन सुरू तरी राजगुरुनगर शहरात नागरिकांची तुडूंब गर्दी
किराणा भाजीपाला व इतर अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून राजगुरुनगर शहरात नियोजन सुरू आहे. मात्र, सेवेचे नियोजन सुलभ प्रमाणात होत असूनही नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यातच नागरिक रस्त्यावर येऊन भाजीपाला, किराणा व अत्यावश्यक सेवा मिळवताना दिसून येत आहेत.