महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्पेशल : दोन्ही पाय निकामे तरी आर्थिक संकटात उभारी घेत कुटुंबाला सावरले; रिक्षा चालकाची प्रेरणादायी कहाणी - रिक्षा चालक नागेश काळे बातमी

पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. शहरात परराज्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला मजूर काम करून दोन वेळ पोट भरत होता. मात्र, कोरोना विषाणूचे भयानक संकट आले आणि लाखोच्या संख्येने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. याच नैराश्येतून अनेकांनी गळ्याला दोरी लावत आपलं सुंदर आयुष्य संपवलं. असे चित्र या अगोदर कधीच पाहायला मिळालेले नाही.

Inspirational story of a rickshaw driver
रिक्षा चालकाची प्रेरणादायी कहाणी

By

Published : Jun 26, 2020, 3:36 PM IST

Updated : Jun 26, 2020, 4:55 PM IST

पुणे- औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात बेरोजगारीतून 39 आत्महत्या झाल्याचे एका आकडेवारीतून समोर आले आहे. आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याआधी पिंपरी-चिंचवड शहरातील जगण्याची जिद्द काय असते, याचे उदाहरण हे रिक्षा चालक नागेश काळे याने घालून दिले आहे. नागेश याचे दोन्ही पाय रेल्वे अपघातात निकामी झाले. परंतु, खचून न जाता आजही लॉकडाऊनच्या आर्थिक मंदीत तग धरून तो उभा आहे. नागेश याने आर्थिक संकटात सापडलेल्या इतर नागरिकांना आत्महत्या करू नये, असे आवाहन केले आहे.

पाहा रिक्षा चालकाची प्रेरणादायी कहाणी...

पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. शहरात परराज्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला मजूर काम करून दोन वेळ पोट भरत होता. मात्र, कोरोना विषाणूचे भयानक संकट आले आणि लाखोच्या संख्येने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. याच नैराश्यातून अनेकांनी गळ्याला दोरी लावत आपलं सुंदर आयुष्य संपवलं. असे चित्र या अगोदर कधीच पाहायला मिळालेले नाही. नागरिक आणि कामगार हताश झाले आणि नैराश्यात गेल्याचे दिसत आहेत. मात्र, नागेश काळे हा रिक्षा चालक आर्थिक मंदीतही तग धरून असून उभारी घेण्याचा प्रयत्न करत आहे.

2013 साली त्याने रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले. त्यानंतर काय करायचे असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला होता. मात्र, आजपर्यंत तो रिक्षा चालवून आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहे. गेल्या तीन महिण्यापासून त्याची रिक्षा बसून होती. तरीही छोट मोठं काम करत रिक्षामार्फत तो पैसे मिळवून कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळत आहे. तो म्हणाला, हताश न होता मी रिक्षा चालवून कुटुंब चालवत आहे, दररोज 100 ते 200 रुपये मिळवत आहे. सध्याची परिस्थती अत्यंत वाईट आहे. आयुष्य जगत असताना आत्महत्या करणे चुकीचे आहे. आयुष्य आणि हा जन्म एकदाच मिळतो. त्यामुळे आत्महत्या करू नये. लॉकडाऊनचा काळ खूप खडरत होता. रिक्षा चालकाची अवस्था खूप वाईट झाली आहे, असे तो म्हणाला. कोरोनाच्या आर्थिक संकटात सर्वजण सापडले आहेत. पण त्यावर मात करा. आत्महत्या करणे हा काय पर्याय नाही, असे आवाहन त्याने केले आहे.

आई आणि पत्नीचे पाठबळ मिळाल्याने तो थकला नाही. यावेळी नागेश याची पत्नी अर्चना म्हणाल्या की, अपघात होण्याच्या अगोदरपासून माझं आणि नागेश यांचं एकमेकांवर प्रेम होते. 2013 मध्ये नागेश याचा रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले. परंतु, मी पाठ न फिरवता दोन वर्षानंतर प्रेम विवाह केला. आयुष्यभर साथ तर निभावयाची असे वचन त्यांना दिले आहे. नागेश यांच्यासोबत जगायचं अस ठरवलं आणि शेवटपर्यंत साथ द्यायची आहे. आज सुतभरही प्रेम कमी झालेले नाही. नागेशने रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमवल्याचे आईला घरी आल्यानंतर समजले. त्यानंतर नागेश याच्या आई काशीबाई म्हणाल्या, अपघात झाल्यानंतर दहा दिवस मला काही माहिती नव्हते. सर्वांनी नागेशने रेल्वे अपघातात पाय गमावले आहेत हे माहिती होऊ दिले नव्हते. पण, ज्या दिवशी नागेशला घरी आणले तेव्हा ही दुःखत घटना समोर आली. यामुळे तात्पुरते खचली. मात्र, कर्ज काढून नागेशला रिक्षा घेऊन दिली आणि पुन्हा आईने मुलाला स्वतःच्या पायावर उभा केला. आजही कोरोनाचा आर्थिक संकटाला तो तोंड देत असून नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास आहे, असं त्या म्हणाल्या.

Last Updated : Jun 26, 2020, 4:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details