पुणे - नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातील कडेगाव-पलूस या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वजीत कदम यांचा दणदणीत विजय झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवण्यात विश्वजीत कदम यांना यश आले. एकंदरीतच त्यांच्या या यशाबद्दल आणि आगामी वाटचालीबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी...
काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून १ लाख ६२ हजार ५२१ मताधिक्य मिळवून विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते कुणालाही पडलेली नाहीत. तर नोटाला मतदारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते दिली आहेत. शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते हे ८ हजार ९७६ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत.