महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार अशोक पवार यांच्या मतदारसंघात पाच कोविड सेंटरची उभारणी - mla-ashok-pawar latest news

प्रतिभा आरोग्य मंदिर या नावाने उभारलेल्या कोविड सेंटरमुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला आहे. रुणांना मनोरंजनासाठी मोठ्या स्क्रिनच्या माध्यमातून वेगवगळे कार्यक्रम दाखवले जातात.

पाच कोविड सेंटरची उभारणी
पाच कोविड सेंटरची उभारणी

By

Published : May 25, 2021, 7:43 AM IST

Updated : May 25, 2021, 2:16 PM IST

शिरूर (पुणे) - शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार व जि.प.सदस्य सुजाता पवार यांनी राव लक्ष्मी फांउडेशनच्या माध्यमातून " प्रतिभा आरोग्य मंदिर" या नावाने पाच कोविड सेंटर उभारले आहे. वाढत्या कोरोना रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी हे सेंटर उभारण्यात आले आहेत.

आमदार अशोक पवार यांच्या मतदारसंघात पाच कोविड सेंटरची उभारणी
रावलक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून चालू असलेल्या प्रतिभा आरोग्य मंदिर1) मांडवगण फराटा 150 बेड2) उरळगाव 120 बेड3) तळेगाव ढमढेरे 100 बेड4) वाजेवडी चौफुला 150 बेड5) कोरेगाव मूळ 150 बेडपाच कोविड केअरप्रतिभा आरोग्य मंदिर या नावाने उभारलेल्या कोविड सेंटरमुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला आहे. रुणांना मनोरंजनासाठी मोठ्या स्क्रिनच्या माध्यमातून वेगवगळे कार्यक्रम दाखवले जातात. कोविड सेंटरमध्ये जेवणाची सोय ही घरगुती पद्धतीने केली जाते. आमरस, शिरखुरमा, चिकन, मटण तर कधी पंचपक्वान या कोविड सेंटरमध्ये दिले जात आहे. या गोष्टीमुळे पवार पती-पत्नी यांची मतदार संघात चर्चा होत असून त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Last Updated : May 25, 2021, 2:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details