पुणे - जलतरण तलावात एका संगणक अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. वैभव आचाल जैन (वय २३ वर्षे) असे संगणक अभियंत्याचे नाव आहे. तो हिंजवडीमध्ये एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता.
पुणे : जलतरण तलावात पडून अभियंत्याचा मृत्यू - pune
थेरगाव येथील पालिकेच्या खिंवसरा जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या अभियंत्याचा मृत्यू झाला आहे.
वैभव हा काल (सोमवार) तो सायंकाळी थेरगाव येथील महापालिकेच्या खिंवसरा जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहण्याची तयारी करून तो बसला होता. त्याला अचानक चक्कर आल्याने तो ५ फूट खोल पाण्यात पडला. त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नव्हते. दहा मिनिटांनंतर तेथे जीवरक्षक पोहोचले. त्यानंतर वैभवला तात्काळ बेशुद्धावस्थेत तातडीने औंध येथील शासकीय रूग्णालयात रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैभवला मृत घोषित केले, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.