बारामती (पुणे) - विरोधक सारखे म्हणतात की हे सरकार एक महिन्याने, तीन महिन्याने, चार महिन्यांनी पडणार आहे. मला हे ऐकून गंमत वाटते. कारण, भांडी मोकळी असतात ती फारच आवाज करतात, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आज आमची 'टर्म' आहे, कधीतरी तुमची असेल, मात्र ती लवकर येणार नाही, अशी बोचरी टीका करून हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. आपण पंचवीस वर्षे सत्तेत राहू, असे त्यांनी सांगितले.
मोकळी भांडीच फार आवाज करतात; खासदार सुप्रिया सुळेंची विरोधकांवर टीका - खासदार सुप्रिया सुळेंची विरोधकांवर टीका
आज आमची 'टर्म' आहे. कधीतरी तुमची असेल, मात्र ती लवकर येणार नाही, अशी बोचरी टीका करून हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. आपण पंचवीस वर्षे सत्तेत राहू असे सांगितले.
कौतुकासाठीच पंतप्रधान येत आहेत
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, राज्यातील सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यातच शनिवारी पंतप्रधान पुण्यात येणार आहेत. कदाचित ते आपले कौतुक करण्यासाठीच येत आहेत, असा मी त्याचा चांगला अर्थ काढते. आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोना लसी संदर्भातील माहिती घेण्यासाठी पंतप्रधान येत आहेत. यापेक्षा सरकारचे काय मोठे यश असू शकते, असे म्हणत देशाचे पंतप्रधान जरी वेगळ्या विचाराचे असले तरी त्यांना आपले पुणेच हवेहवेसे वाटते आणि या ठिकाणी काम होत असल्याचा मला आनंद वाटतो.