पुणे- पिंपरी चिंचवड शहरातील पाच जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या दोन दिवसांत एकूण ८ जणांना घरी सोडण्यात आले असून सर्वांची प्रकृती उत्तम आहे. एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना भोसरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर एका थायलंड येथून आलेल्या तरुणावर ही त्याच रुग्णालयात उपचार केले असून १४ दिवसांच्या दोन टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांचा संख्या १२ आहे. यापैकी ८ जणांना घरी सोडण्यात आले. यावेळी डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, पोलीस यांनी टाळ्या वाजवून कोरोनामुक्त व्यक्तींचा उत्साह वाढवत डॉक्टरांचे कौतुक केले आहे. शहरात १२ जण करोना बाधित होते. मात्र,डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे ८ जण कोरोनामुक्त झालेले असून बरे झाले आहेत.