पुणे- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या कारवाईत २ लाख ४५ हजार रूपये किमतीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आले असून एकाला अटक करण्यात आली आहे. रवी ऊर्फ राजेश बंडू थोरात (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या कारवाईत २ लाख ४५ हजार रूपयांच्या आठ दुचाक्या जप्त - pimapri chinchwad commissior office
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या कारवाईत २ लाख ४५ हजार रूपये किंमतीच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी याने दारू पिण्यासाठी व मौजामजा करण्यासाठी तीन दुचाकी चोरल्या होत्या. तिन्ही दुचाकी त्याने त्याच्या घराजवळ विक्री करण्यासाठी ठेवल्या होत्या, याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार त्यांनी रवीला अटक केले. त्याच्या ताब्यातून ९० हजार रूपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
दुसऱ्या कारवाईत दिघी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दिघी परिसरात त्याच्या दोन मित्रांसह वाहनचोरी केल्याचे सांगितले. त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेऊन तिघांकडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी जप्त केल्या. भोसरी आणि दिघी पोलीस ठाण्यातील ऐकून सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. ही कारवाई दिघी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने केली आहे.