राजगुरुनगर (पुणे) - जिल्ह्यातील खेड तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली संपुर्ण वर्षाच्या फी वसुली करत आहेत. अशातच खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना नोटीस काढली आहे. विद्यार्थी व पालकांना फी वसुलीसाठी तगादा लावल्यास शाळांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा गट शिक्षण आधिकारी संजय नाईकडे यांनी दिला आहे
खेड तालुक्यात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या फी वसुलीला शिक्षण विभागाचा चाप
खेड तालुक्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा फीसाठी त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे येत आहेत. त्यामुळे सर्व शाळांना नोटीस देण्यात आली असून संस्था चालक व मुख्याध्यापक यांनी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा संस्था चालक व शाळांवर शिस्तभंगाची कडक कारवाई करणार असे संकेत गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी दिले आहे.
खेड तालुक्यात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या फी वसुलीला शिक्षण विभागाचा चाप