पुणे: येस बँक-डीएचएफएल फसवणूक (Yes Bank DHFL Fraud) प्रकरणात ईडीने मोठी (EDs major action in Yes Bank DHFL fraud case) कारवाई केली आहे. या प्रकरणात ईडीने संजय छाब्रिया (Sanjay Chhabria) आणि अविनाश भोसले या दोन बांधकाम व्यावसायिकांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. संजय छाब्रिया यांची 251 कोटी आणि अविनाश भोसले यांची 164 कोटी (Total assets worth 415 crores seized in Pune) मालमत्ता जप्त केली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली होती. अटक करण्याच्या काही दिवसांपूर्वीच, भोसले यांनी येस बँक-डीएचएफएल पैशांमधून हेलिकॉप्टर खरेदी केल्याचा ईडीचा दावा होता. त्यानंतर ईडीने आता त्यांच्या मालमत्तेवर मोठी जप्ती आणलेली आहे. याप्रकरणी ईडीने संजय छाब्रिया यांची 251 कोटी आणि अविनाश भोसले यांची 164 कोटी रुपये अशी एकूण 415 कोटी (Total assets worth 415 crores seized in Pune) रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.