महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Supriya Sule On ED : ईडीने पवार साहेबांना नोटीस पाठवली अन् राज्यात सत्ता आली - सुप्रिया सुळे - सुप्रिया सुळे मराठी बातमी

ईडीने पवार साहेबांना नोटीस ( ED Send Notice Sharad Pawar ) पाठवली, तेव्हा कुठे आपल्या हातात सत्ता होती?. ईडीने पवार साहेबांना नोटीस पाठवली आणि राज्यात सत्ता आली, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली ( Supriya Sule On ED ) आहे.

Supriya Sule
Supriya Sule

By

Published : Apr 3, 2022, 7:01 PM IST

Updated : Apr 3, 2022, 10:52 PM IST

बारामती -ईडीने पवार साहेबांना नोटीस ( ED Send Notice Sharad Pawar ) पाठवली, तेव्हा कुठे आपल्या हातात सत्ता होती?. ई़डीने पवार साहेबांना नोटीस पाठवली आणि राज्यात सत्ता आली. त्यामुळे ईडीचे आभार मानले पाहिजे. ईडीची नोटीस आमची ताकद वाढवण्याचे काम करते. त्यामुळे त्याला घाबरण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली ( Supriya Sule On ED ) आहे.

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील शेतकरी मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप, आमदार यशवंत माने, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे कार्यक्रमात संवाद साधताना

केंद्रीय मंत्र्यांनी केले राज्यातील बजेटचे कौतुक -कोरोना काळात केंद्र सरकारने सर्वच खासदारांचा विकास निधी थांबवला. मात्र, त्याच वेळी महाराष्ट्र सरकारने सर्व आमदारांना आवश्यक तो निधी पुरवला. संसदेत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले. महाविकास आघाडी सरकारकडे देशाचे लक्ष आहे. राज्य सरकारच्या कामाचे कौतुक विरोधक जरी तोंडभरून करत नसले तरी सत्य बाहेर येतेच, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला आहे.

हेही वाचा -'राज ठाकरे हे तर पुष्पातले फुसके फ्लॉवर'; शरद पवारांवरील टीकेला रुपाली पाटलांकडून प्रत्युत्तर

Last Updated : Apr 3, 2022, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details