पुणे : ईडीकडून पुण्यात आज पुन्हा एकदा अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रिफ यांच्या साखर कारखाना मनी लाँडरींग प्रकरणी ही छापेमारी करण्यात येत आहे. सोमवारी शहरात तब्बल नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. माजी मंत्री मुश्रीफ यांच्या व्यवसायिक भागीदार असलेल्या पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी आणि कंपन्यांच्या कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात येत आहे. याआधी देखील ईडीकडून पुण्यातील या व्यावसायिकाच्या घरी तसेच कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलीस बंदोबस्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोबत ठेवला आहे.
कार्यालयांवर छापेमारी :पुण्यातील सॅलिस्बरी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह इतर ठिकाणी ही छापेमारी करण्यात येत आहे. याआधी देखील मागच्या महिन्यात पुण्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात ही कारवाईही करण्यात आली होती. आत पुन्हा आज शहरात काही ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये व्यवसायिक विवेक गव्हाणे, सीए जयेश दुधेडीया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्या घरी तसेच कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात करण्यात येत आहे. याअगोदरही देखील ईडीकडून पुण्यातील व्यावसायिकाच्या घरी व कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली होती. काही ठिकाणी तर ये जा करण्यात देखील प्रतिबंधित करण्यात आले होते.