पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमशंकर येथे परंपरेनुसार पंचक्रोशीतील राजपूर, निगडाळे, भीमशंकर येथील नागरिकांनी कोकण कड्यावर धार्मिक पद्धतीने होळी पेटवून होळी पोर्णिमेचा सण साजरा केला. विशेष म्हणजे या वेळी होळीमध्ये लाकूड न जाळता फक्त पाला पाचोळा व शेणाच्या गोवऱ्या पेटवून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा प्रयत्न केला.
भीमाशंकर हा परिसर जंगलाचा आहे. या परिसरातील जंगल कायम टिकून राहावे व निसर्गाचे हे देखणे रुप नष्ट होऊ नये, यासाठी आज होळी सण साजरा करताना लाकूड न जाळता पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधवांनी होळीचा सण साजरा केला.