पुणे- अजित पवार यांना दाऊदबाबत विचारणा केली असता, अरे कशाला दाऊद, दाऊद करत बसलात अरे म्हणत दाऊदबाबतचा निर्णय केंद्र सरकार व संबंधित अधिकारी घेतील. त्यामुळे या विषयावर बोलून वाद निर्माण करणार नाही, अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावधतेची भूमिका घेतली.
बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात (सीओइपी) उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, दाऊदने भारतात तसेच भारताबाहेर राहून देशातील वातावरण खराब केले आहे. अनेक कट-कारस्थाने रचली आहेत. काल माध्यमाद्वारे असे दाखविण्यात आले की, पाकिस्तानने दाऊद पाकिस्तानात असल्याचे कबूल केले. आज दाखवले की, दाऊद पाकिस्तानात नाही. नेमके काय खरे आणि काय खोटे आहे माहित नाही. पण, दाऊदबाबत योग्य तो निर्णय केंद्र त्यांच्या पातळीवर घेईल. दाऊद जर पाकिस्तानात असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर केंद्राकडून चर्चा केली जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
हेही वाचा -पिंपरीत वापरलेले वैद्यकीय साहित्य कचऱ्यात टाकले; आरोग्य विभागाने ठोठावला 25 हजारांचा दंड