पुणे -मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीतील नेते भूमिका मांडतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. ते पुण्यात मांजरी येथे बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारला कायदा करण्याची मागणी केली आहे. बुधवारी (दि. 16 जून) कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंदोलनात पालकमंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि इतर नेते भूमिका मांडतील असे अजित पवार म्हणाले. जुलै महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन आहे. त्यामधे मराठा आरक्षणाबाबत चर्चा होईल, असेही यावेळी पवार म्हणाले.
पुण्यात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे संचालक बैठकीसाठी अजित पवार आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी मराठा आरक्षण, आघाडी सरकार, कोरोना स्थिती अशा विविध विषयांवर भाष्य केले.
कठोर निर्णय घ्यावा लागेल
कोरोना परिस्थिती बाबत बोलताना, पुण्याचा पॉझिटिव्हीटी दर सध्या 5 टक्क्यांच्या खाली आहे. मात्र, पुन्हा जर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर कठोर निर्णय घेण्याची तयारी आम्ही ठेवली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी, असे अजित पवार म्हणाले.
विरोधकांच्या पोटात दुखते
भाजपच्या आध्यत्मिक आघाडीकडून पायी वारी काढण्याबाबत सांगितले जात आहे. हे सरकार आल्याने विरोधी पक्षातील अनेकांच्या पोटात दुखणे थांबलेले नाही. महाविकास आघाडी सरकार आज पडेल, उद्या पडेल, असे म्हणत ते वेळ काढत आहेत. दुटप्पी भूमिका घेत आहेत कोरोना सारख्या परिस्थिती पायी वारी न काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, विरोधक चुकीची भूमिका घेत असल्याचे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाची इच्छा गैर नाही