पुणे - शहरासोबतच आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन काही प्रयोग करून नागरिकांना या लॉकडाऊनच्या काळात जीवन सुसह्य करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातही प्रशासनाकडून ग्रामदूत संकल्पना राबवली जात आहे. त्यामुळे सध्या हे ग्रामदूत भोर तालुक्यात देवदूत ठरत आहेत.
भोरमध्ये अनोखा प्रयोग, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामदूत ठरत आहेत 'देवदूत'
पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातही प्रशासनाकडून 'ग्रामदूत' संकल्पना राबवली जात आहे. त्यामुळे सध्या हे ग्रामदूत भोर तालुक्यात देवदूत ठरत आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात ग्रामदूत संकल्पना राज्यात प्रथमच राबवली जात आहे. भोरचे प्रांत राजेंद्र जाधव आणि तहसीलदार अजित पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम भोर वेल्हे तालुक्यात राबवला जात आहे. हे ग्रामदूत गावातील लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या अत्यावश्यक वस्तूंची यादी घेऊन जवळ असलेल्या मोठ्या गावात जाऊन लोकांना त्या वस्तू घरपोच देत आहेत. त्यामुळे लोकांना घरपोच त्यांच्या गरजेच्या वस्तू मिळत आहेत. त्यामुळे, परिणामी गावात व तालुक्याच्या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत नाही. भोर तालुक्यात चालू केलेला ग्रामदूत पॅटर्न हा राज्याला आदर्श देणार ठरणारा आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर, राज्यातील गावांनी ह्या पद्धतीने गावात सेवा दिल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यास नक्कीच मदत होईल.