पुणे- देशातील ९ राज्यातील १३१हून अधिक गडकिल्ल्यांवर आणि परदेशातील ६ किल्ल्यावर एकाच दिवशी दुर्गपूजा करण्यात आली. गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा व दुर्गसंवर्धनाच्या संकल्पनेतुन ही पूजा करण्यात आली. विविध सरदार, संस्थानिक व राज घराण्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुर्गपूजा करण्यात आली. यासाठी शिवाजी ट्रेल संस्था व किल्ले भोरगिरी संवर्धन समितीच्या संयुक्त विद्यमाने दुर्गपुजा आयोजित करण्यात आली होती
ऐतिहासिक सोहळा भिमाशंकर जवळील भोरगिरी भोरगडावर उत्साहात पार पडला. शिवाजी ट्रेल संस्थेचे दुर्गपुजेचे हे २२वे वर्ष आहे. कागल-कोल्हापूर येथील ऐतिहासिक घाटगे सरदार घराण्याचे वंशज पृथ्वीराज घाटगे व शिवाजी ट्रेलचे संचालक तथा किल्ले भोरगीरी संवर्धन समिती अध्यक्ष सचिन तोडकर यांच्या हस्ते भोरगिरी किल्ल्यावरील लेण्यांमध्ये असणाऱ्या शिवमंदिरात दुर्गपुजा पार पडली.