पुणे -कोरोना विषाणू प्रसाराच्या पाश्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. हाताला काम नसल्यामुळे अनेक गरजू, गोरगरीब कुटुंबांच्या उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत अनेक सामाजिक संस्था, संघटना, आपापल्या परीने मदत करत आहेत. काही संस्थांकडून अन्नदान तर काहींकडून विविध प्रकारची मदत केली जात आहे.
पुणे : दुगड जीव दयाल परिवारातर्फे आत्तापर्यंत एक लाखाहून अधिक गरजूंना मदत - world health emergency
गोरगरिबांवरील संकट हलके करण्याच्या उद्देशाने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पुण्यातील दुगड जीव दयाल परिवारातर्फे गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे. रोज पाच ते सात हजार गरजूंना या संस्थेकडून जेवण दिले जात आहे.
गोरगरिबांवरील संकट हलके करण्याच्या उद्देशाने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पुण्यातील दुगड जीव दयाल परिवारातर्फे गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे. रोज पाच ते सात हजार गरजूंना या संस्थेकडून जेवण दिले जात आहे.
'लॉकडाऊनमध्ये गरिबांचे हाल होत आहेत. हे पाहत असताना त्यांच्यासाठी काहीतरी करावे, त्यांना उपाशी रहावे लागू नये म्हणून आम्ही रोज या लोकांना मदत करण्याचे ठरवले. जसा लॉकडाऊन सुरू झाला, तशी ही संस्था जेवण पुरवण्याचे काम करत आहे. इथे उभारलेले स्वयंपाकघर अनेकांची भूक भागवत आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीने शहराच्या विविध भागांत हे जेवण पुरवले जात आहे,' अशी माहिती संस्थेचे प्रमोद दुगड यांनी दिली. 'आज प्रत्येकजण ज्याला जे शक्य होत आहे, तो त्या-त्या पद्धतीने मदत करत आहे. गरिबांना उपाशी रहावे लागू नये, हा एकमेव उद्देश ठेवून पुण्यातील अनेक सामाजिक संस्था मदत करत आहेत', असे ते म्हणाले.