महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gold Purchase Increased : यंदाच्या दिवाळीत व्यापाऱ्यांसाठी अच्छे दिन ; भाव घटल्याने यंदाच्या दिवाळीत सोने खरेदीत वाढ - सराफ व्यापारी

दिवाळीत सराफ व्यवसायिकांसाठी अच्छे दिन आले असून ऐन दिवाळीत सोन्याचे भाव घटल्याने (Gold prices fall) नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले जात (Gold Purchase Increased on occasion of Diwali) आहे. सोने-चांदीचे भाव कमी झाल्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने सराफ बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी लगबग वाढली आहे.

Gold Purchase Increased
सोन्याची खरेदी वाढली

By

Published : Oct 24, 2022, 10:08 AM IST

पुणे :गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण उत्सव निर्बंधामध्ये साजरे झाले. अनेकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. यंदा मात्र निर्बंधमुक्त असल्याने मोठ्या उत्साहात सण उत्सव साजरे होत आहे. यंदाच्या दिवाळीत सराफ व्यवसायिकांसाठी अच्छे दिन आले असून ऐन दिवाळीत सोन्याचे भाव घटल्याने (Gold prices fall) नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले जात (Gold Purchase Increased on occasion of Diwali) आहे.

सोन्याची खरेदी वाढली प्रतिक्रिया देताना सराफ व्यावासायिक

सोने-चांदीचे भाव वधारले :दिव्यांचा, भेटवस्तूंचा, विद्युत रोषणाईचा तसेच उत्साह आणि जल्लोषाचा सण म्हणजेच (Diwali 2022) दिवाळी. त्यात सोने-चांदीचे भाव कमी झाल्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने सराफ बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी लगबग वाढली आहे. धनत्रसयोदशीला देखील मोठ्या प्रमाणावर पुणेकर नागरिकांकडून सोने चांदीची खरेदी करण्यात आली आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेकजण ही खरेदी करत आहेत. तसेच पाडव्याच्या दिवशी देखील अश्याच पद्धतीने नागरिकांकडून खरेदी केली जाणार, असल्याचा विश्वास सराफ व्यवसायिकांकडून व्यक्त केला जात आहे.

खरेदीला चांगला प्रतिसाद :किरकोळ बाजारात २२ कॅरेट सोने ४७ हजार ६३० आणि २४ कॅरेट सोने ५० हजार ७७० प्रति १० ग्रॅम होते. त्याचबरोबर चांदी ५८ हजार २०० रुपये किलो होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सोने चांदीची खरेदी करण्यात आली आहे. सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे नागरिकही सोन्याची खरेदी करत असून गुंतवणुकीवर भर देत आहेत. भारतामध्ये सध्या तरी मंदीचे वातावरण नाही, त्यामुळे ग्राहकांना संधी मिळाली असून उत्साहाने सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारात चांगली स्थिरता असून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत (Gold Purchase Increased) आहे.


हिरे रत्न खरेदीसाठी उत्साह :दोन वर्षाच्या खंडानंतर ग्राहकांमध्ये हिरे आणि रत्न खरेदीसाठी उत्साह वाखणण्याजोगा होता. दिवाळीत नाजूक, सुबक आणि नाविण्यपुर्ण हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीकडे ओढा वाढला असून, रत्नांच्या खरेदीसाठी मागणी वाढली आहे.असे देखील यावेळी सराफ व्यवसायिक शशांक अमराळे यांनी माहिती (Gold Purchase on occasion of Diwali) दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details