पुणे - गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. राज्यासह देशभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. मंदीच्या छायेत अवघा देश असून यातून विघ्नहर्ता गणपती बाप्पा देखील सुटू शकलेले नाहीत. कारण, गणपती मूर्तींमध्ये तब्बल १५ टक्क्यांनी दरवाढ झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ग्राहक कमी झालेले दिसत आहेत. तर दुसरीकडे गणपती मूर्तीचे नक्षीकाम करणारे कामगार हे देखील बेरोजगार झाले आहेत. मूर्ती व्यावसायिकांना जीएसटी आणि मंदीचा चांगलाच फटका बसल्याने त्यांनी कामगारांना कामावरून कमी केले आहे.
सुखकर्त्यावर मंदीचं विघ्न; गणेश मूर्तीचे दर १५ टक्क्यांनी वाढले - जीएसटी
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण असून गणेश भक्त नेहमीच बाप्पाचं जंगी स्वागत करतात. मात्र, यावर्षी देशात मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे. यातून विघ्नहर्ता गणेश देखील सुटू शकला नाही. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींचे उत्पन्न कमी आहे. कारण, मूर्ती तयार करण्याच्या अगोदर लागणारा कच्चा मालावर जीएसटी आकारली जाते. यामुळे व्यवसायिक हैराण आहेत.
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण असून गणेश भक्त नेहमीच बाप्पाचं जंगी स्वागत करतात. मात्र, यावर्षी देशात मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे. यातून विघनहर्ता गणेश देखील सुटू शकला नाही. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींचे उत्पन्न कमी आहे. कारण, मूर्ती तयार करण्याच्या अगोदर लागणारा कच्चा मालावर जीएसटी आकारली जाते. यामुळे व्यावसायिक हैराण आहेत. त्यात काही महिन्यांपासून मंदी सुरू आहे. याचा थेट फटका ग्राहक, व्यावसायिक आणि कामगार यांना बसला आहे.
गोरख कुंभार गेल्या तीस वर्षांपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे काम करतात. त्यांनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षांपासून हा व्यवसाय सुरू केला. तेव्हा, जोमात चालणार व्यवसाय आता मात्र कासवगतीने सुरू आहे. दरवर्षी कुंभार कुटुंब हे ४ हजार गणेश मूर्ती तयार करतात. मात्र, बाजारातील वातावरण पाहता त्यांनी यावर्षी दोनच हजार मूर्ती तयार केल्या आहेत. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव जोमात साजरा होईल. मात्र, ग्राहकांनी गणेश मूर्तींचे भाव वाढल्याने नाराजी व्यक्त करत सरकारने मंदी बाबत समाधानकारक पाऊले उचलावीत, असे ग्राहकांनी आवाहन केले आहे.