महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डीएसकेच्या गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्याची आशा; फसवणुकीमुळे ठेवीदारांचा मृत्यू झाल्याचा आरोप

डीएसके समूहाकडून फसवणूक झाल्याने धक्का बसल्यामुळे 18 ठेवीदारांचा मृत्यू झाल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे.

dsk kulkarni
डी. एस. कुलकर्णी

By

Published : Mar 10, 2020, 5:46 PM IST

पुणे -पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याकडे पैसे गुंतवणारे ठेवीदार आता आपले पैसे परत मिळण्याची मागणी केली आहे. परंतु, अजूनही त्यांना पैसे परत मिळण्याची आशा दिसत नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे राज्यभरातील सुमारे १८ ठेवीदारांचा गेल्या दोन वर्षांत विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. डीएसके समूहाकडून फसवणूक झाल्याने धक्का बसल्यामुळेच या ठेवीदारांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.

हेही वाचा -कमलनाथ मंत्रिमंडळाने दिला राजीनामा, लवकरच नवीन कॅबिनेट होणार स्थापन ..

मृत्यू झालेल्यांपैकी काही ठेवीदार या प्रकरणांच्या सुनावणीवेळी न्यायालयात देखील हजर राहत होते. तर आजारपण, मुला-मुलींचे लग्न, घराचे बांधकाम अशा विविध कारणांसाठी त्वरित पैसे मिळावेत म्हणून अनेकांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.

डीएसके, पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई, मेव्हणी यांच्यासह काही नातेवाईक आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यातून बॅंकेच्या अधिकाऱ्यांना या गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे. तर, मुख्य आरोपींसह इतरांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. डीएसके यांनी ३५ हजार गुंतवणूकदार आणि बॅंकांची सुमारे जवळपास ३ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गुंतवणूकदार मात्र पैसे मिळतील या आशेवर आहेत.

हेही वाचा -ठाकरे-मुंडे यांच्या स्मारकाचे टेंडर घेऊ नका; इम्तियाज जलील यांचा ठेकेदारांना इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details