पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरी करावी लागले. यंदा मात्र निर्बंध मुक्त झाल्याने सर्वच सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरा होत आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्यानिमित्ताने पुणे शहरातील बाजारपेठ हे सजले असून ठिकठिकाणी पणत्या, आकाशकंदील, लक्ष्मी हे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. यंदा दिवाळीत महागाईचा फटका जरी इतर वस्तूंवर बसला असला तरी दिवाळीत सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाणारे आणि कोरोना काळात ज्याचे महत्त्व अधिक वाढले असा दिवाळीत सुका मेवा स्वस्त झाला ( Diwali Dry Fruits At Cheap Price ) आहे. आत्ता सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे.
सुकामेवाच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत घट :देशातील घाऊक बाजारपेठेत काजू, बदाम, मनुक्यासह सुकामेव्याच्या दरात लक्षणीय घट झाली ( Dry Fruits Price Significantly Decrease ) आहे. दिवाळीच्या सणाला सुकामेव्याला प्रचंड मागणी असते. मात्र, गेल्या काही महिन्यांत सुकामेव्याचे दर प्रचंड वाढले होते. बदामाचा प्रतिकिलो भाव जे 800 ते 1000 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. परंतु, घाऊक बाजारपेठेत आता हेच दर 600 रुपयांपर्यंत खाली उतरला आहे.
50 टक्के ग्राहक वाढले :जगभरात सुकामेव्याच्या उत्पादनात वाढ झाल्याने मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सुकामेव्याची आवक वाढली ( Dry Fruits Production Increase ) आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात मागणीही वाढली आहे. मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात सुकामेवा बाजारात दाखल होत असल्याने भावात दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. दिवाळीनिमित्त विविध संस्था, कंपन्यांकडून अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचा सुकामेवा असलेले बॉक्स भेट स्वरूपात देण्यात येतात.कोनामुळे मागील दोन वर्ष 'वर्क फ्रॉम होम' मुळे सुकामेव्याच्या मागणीत घट झाली होती. यंदा सर्व काही पुर्वपदावर आल्याने सुकामेव्याला प्रचंड मागणी आहे. याखेरीज, दिवाळीनिमित्त तयार करण्यात येणाऱ्या फराळातही सुकामेव्याचा वापर होत असल्याने फराळासाठीही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. यंदा जगभरात सुकामेव्याचे चांगले उत्पादन झाल्याने बाजारात सुकामेवा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. त्यामुळे, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाव खाणारा सुका मेवा यंदा मात्र चांगलाच नरमल्याचे चित्र आहे.जवळपास 50 टक्क्यांहून अधिक यंदाच्या दिवाळीत ग्राहक वाढले असल्याचे चित्र पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात पाहायला मिळत आहे.
कोरोनानंतर सुकामेवा विक्रीत वाढ :कोरोनाच्या काळात आरोग्याचं महत्त्व हा सर्वानाच समजल.या काळात ह्युमिनीटी वाढविण्यासाठी सुका मेवा किती महत्त्वाचं आहे.हे सर्वसामान्य नागरिकांना कळल्यानंतर सुका मेव्याच्या खरेदीत वाढ होत गेली आहे.आणि यंदा दिवाळीत नागरिकांकडून तसेच विविध कंपनीकडून देखील मिठाई ऐवजी सुका मेव्याला पसंती दिली जात आहे.आणि त्यामुळेच यंदाच्या दिवाळीत सुका मेवा खरेदीत
सुकामेवा दर (प्रतिकिलो) :बदाम 560 ते 625 रुपये, अक्रोड 700 ते 1000 रुपये, काजू ते 1200 रुपये, खारा पिस्ता 900 रुपये, मनुके 230 ते 300 रुपये. पुण्याच्या बाजारात बदाम हे कॅलिफॉर्निया, ऑस्ट्रेलियातून येतात. तर काजू गोवा, कर्नाटक कोकण, केरळतून येतात. तर मनुके सांगली तसेच खारा पिस्ता इराण, अमेरिका, कॅलिफोर्नियातून येतात. अक्रोड - अमेरिका, चीली व भारताच्या काही भागातून येत असतात.