पुणे -कोरेगाव भीमा येथे 202 वा शौर्यदिन साजरा होत असताना देशभरातून २० लाखांपेक्षा जास्त अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आले होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीचा हा सोहळा पाहण्यासाठी अनेक भीम अनुयायी याठिकाणी दाखल झाले. या संपूर्ण परिसराचा नजारा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्यात आला आहे.
ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतुन कोरेगाव भिमा येथील शौर्यदिनाचा सोहळा... हेही वाचा... देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला अर्थमंत्री जयंत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...
नवीन वर्षाची सुरुवात ही कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभावर विद्युतरोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजीने करण्यात आली. फुलांच्या माळांनी सजवलेला विजयस्तंभ आणि भक्तिमय वातावरणामध्ये दिवसभर फुलून गेलेला परिसर. यामध्ये लहान मोठे सर्वच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा... काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आमदार संग्राम थोपटे यांच्या फोटोला फासले काळे
यावर्षीची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागू नये, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गाड्यांची पार्किंगची सोय केली होती. तसेच भाविकांना ये-जा करण्यासाठी बसची सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात होणारी गर्दी चांगल्या नियोजनामुळे आटोक्यात आली. त्यामुळे हा शौर्य दिनाचा सोहळा व्यवस्थित पार पाडला
हेही वाचा... दृष्टीहीन व्यक्तींसाठी आरबीआयचे अॅप; नोटांची सत्यता पटविण्याकरता होणार मदत
दोनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाची प्रेरणा घेऊन या ठिकाणी येणारा प्रत्येक अनुयायी उत्साही वातावरणामध्ये विजयस्तंभाला सलामी देत होता. प्रचंड गर्दी असतानाही उत्साही वातावरणाने हा संपूर्ण परिसर अगदी फुलून गेला होता. या परिसराला एखाद्या जत्रेचे स्वरूप आले होते.