महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime : पुण्यात तेलंगाणातून तस्करी केलेलं ५० कोटींचं ड्रग्ज जप्त, परदेशी लिंक्सची चौकशी सुरू - DRI seized Methaqualone in Pune

डीआरआयनं पुण्यातून तब्बल १०१ किलो पेक्षा जास्त 'मेथाक्वॉलोन' हे अमली पदार्थ जप्त केलं. याचं बाजारमूल्य सुमारे ५०.६५ कोटी रुपये एवढे आहे. (DRI seized Methaqualone in Pune)

DRI seized Methaqualone in Pune
पुण्यात मेथाक्वालोन जप्त

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 11:21 AM IST

पुणे :महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) च्या पुणे प्रादेशिक युनिटनं मोठ्या अमली पदार्थाचा भंडाफोड केला. डीआरआयनं १०१ किलो पेक्षा जास्त प्रतिबंधित 'मेथाक्वॉलोन' हे अमली पदार्थ जप्त केलं. याची किंमत सुमारे ५० कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातं आहे. हे अमली पदार्थ तेलंगाणा राज्यातून तस्करी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी डीआरआयला दिली होती.

गुप्त माहितीच्या आधारे लागलातपास: डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, टीमनं २२ ऑगस्ट रोजी पुण्यात तेलंगणाची नंबर प्लेट असलेली एक कार अडवली. वाहनाची तपासणी केली असता, त्यात चार निळ्या रंगाचे प्लास्टिकचे कंटेनर आढळून आलं. त्या कंटेनरमध्ये पांढरे स्फटिकाचं साहित्य होतं. प्राथमिक फील्ड चाचण्यांद्वारे हे पदार्थ 'मेथाक्वॉलोन' असल्याचे निदर्शनास आलं. त्यानंतर, ५०.६५ कोटी रुपये बाजार मूल्य असलेलं १०१.३१ किलो बेकायदेशीर 'मेथाक्वॉलोन' डीआरआयनं एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींनुसार जप्त केलं.

पाच जणांना अटक : मेथाक्वॉलोन हा नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्याच्या तरतुदींनुसार प्रतिबंधित केलेला सायकोट्रॉपिक पदार्थ आहे. हा पदार्थ आणि त्याचं कार्टेल भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेलं असू शकतात. याचे संबंध परदेशातही असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात तेलंगाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील पाच जणांना एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी बेकायदेशीर खरेदी, विक्री, तसेच वाहतूक आणि निर्यातीत गुंतलेले असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलंय. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

डीआरआय काय करतेकाम: डीआरआय ही भारतातील प्रमुख तस्करी विरोधी एजन्सी आहे. ही एजन्सी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अंतर्गत कार्यरत आहे. मादक पदार्थांची तस्करी, वन्यजीव आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील वस्तूंचा अवैध आंतरराष्ट्रीय व्यापार, तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित व्यावसायिक फसवणूक आणि सीमा शुल्क चुकवणे यासह निषिद्ध वस्तूंची तस्करी शोधणे आणि त्यावर अंकुश ठेवण्याचे काम या संस्थेकडं आहे.

हेही वाचा :

  1. Bank Fraud By Varun Industries : बँकेची 388 कोटींची फसवणूक, वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडवर गुन्हा दाखल
  2. नागपूर विमानतळावरून ३.७ किलो अ‍ॅम्फेटामाइनसारखा पदार्थ जप्त, एकाला अटक
  3. Thane Crime: ज्वेलर्सचे सव्वा तीन कोटींचे सोने चोरणाऱ्या तिघांना अटक, टोळीचे धागेदोरे थेट नेपाळपर्यंत!

ABOUT THE AUTHOR

...view details