महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

DRDO Director Pradeep Kurulkar News : हनीट्रॅपमध्ये अडकण्यापूर्वीचे प्रदीप कुरुलकरचे कारनामे, दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपपत्रात उल्लेख - पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप

डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप आहे. आता डीआरडीओतील कामाची कंत्राटे देताना त्यांनी दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर केल्याचे एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोप पत्रात म्हटले आहे.

Pradeep Kurulkar
प्रदीप कुरुलकर

By

Published : Jul 11, 2023, 12:31 PM IST

Updated : Jul 11, 2023, 2:10 PM IST

पुणे :डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचे समोर आले. त्यानंतर एटीएसने तपास सुरू केला. तेव्हा प्रदीप कुरुलकर मुंबईतील डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये सहा वेगवगेळ्या महिलांना भेटल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात समोर आले आहे. त्यानंतर या महिलांबाबत तपास सुरु करण्यात आला. त्या तपासात डीआरडीओच्या कॅम्पसमधील वेगवेगळ्या कामांची कंत्राटे देण्यासाठी प्रदीप कुरुलकर यांनी दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे एटीएसच्या आरोपपत्रात म्हटले आहे.

डीआरडीओचे संचालक पाकिस्तानी महिलेकडे आकर्षित झाले होते. त्यामुळे त्यांनी संरक्षणाबाबत गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा एटीएसकडून तपास सुरू असताना एटीएसच्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपपत्रात एटीएसने कुरुलकर यांचे चॅटिंगसह विविध माहिती दिली आहे. त्यामध्ये सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या महिलांचा उल्लेख देखील आहे. डीआरडीओचे कंत्राट मिळवून देण्यासाठी लैंगिक शोषण केल्याचे एटीएसने आरोपपत्रात म्हटले आहे.


कुरुलकर यांच्या विरोधात दोषारोप पत्र : डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांच्यावर झारा दास गुप्ताला भारतीय क्षेपणास्त्र मोहिमेची माहिती दिल्याचा आरोप आहे. झारा दास गुप्ता या नावाने पाकिस्तानी गुप्तचर बनावट अकाऊंट चालवत असल्याचे पुढे समोर आले आहे. त्याची माहिती देखील समोर आली आहे. डॉ. कुरुलकर याने ब्रह्मोस मिसाइल, अग्नी - 6 मिसाइल, आकाश मिसाइल, अस्त्र क्षेपणास्त्र, ड्रोन प्रोजेक्ट, रुस्तम प्रोजेक्ट, क्वापटर, इंडियन निकुंज पराशर, यूसीएव्ही, डीआरडीओ ड्यूटी चार्ट, मिसाइल लाँचर, मेटोर मिसात्तर्ल, एमबीडीए, राफेल आदींबाबत झाराला सविस्तर माहिती दिली आहे. एटीएसने हे सर्व चॅटिंग डॉ. कुरुलकर यांच्या विरोधात विशेष न्यायालयात दाखल 1837 पानांच्या दोषारोप पत्रासोबत जोडले आहे.

एटीएसकडून अटक :प्रदीप कुरुलकर यांना 3 मे रोजी हनी ट्रॅप प्रकरणात एटीएसकडून अटक करण्यात आली होती. तेव्हा त्यांचा मोबाईल, लॅपटॉप आणि अन्य साहित्य एटीएसने ताब्यात घेतले होते. एटीएसने लपटॉपसह अन्य साहित्य पुण्यातील फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी दिले होते. त्या तपासणीत डीआरडीओने सोपविलेला लॅपटॉप कुरुलकर यांचा नसून दुसऱ्याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. राणा यांनी याची दखल घेत कुरुलकरचा लॅपटॉप सीलबंद करून 26 मे रोजी एटीएसच्या ताब्यात दिला होता. कुरुळकर यांच्याप्रमाणेच दलातील वरिष्ठ अधिकारी निखिल शेंडे यांना पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने हनीट्रॅप प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. शेंडे बेंगळुरू येथे सध्या कार्यरत आहेत. त्याची हवाई दलाकडून चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते.

हेही वाचा :

  1. Honey Trap Case : डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत, व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये दोन संशयित महिला
  2. Honey Trap Case : हवाई दलातील अधिकारी निखिल शेंडे यांचा हनी ट्रॅप प्रकरणाशी काहीही संबंध नाही - लीला शेंडे
  3. DRDO Pradeep Kurulkar : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो?
Last Updated : Jul 11, 2023, 2:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details