पुणे :डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरूलकर यांना एटीएसकडून अटक हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाक इंटेलिजन्स ॲाफिसरला दिल्याचा संशय एटीएसला आहे. निवृत्तीला सहा महिने राहिले असताना कुरुलकर पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये फसले. सहा महिने मोबाईलच्या माध्यमातून पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या महिलेसोबत संपर्कात होते. तर पुण्यातील संचालकांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवाजी नगर कोर्टात शुक्रवारी हजर करण्यात आले असून त्यांना नऊ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
देशाच्या सुरक्षिततेला धोका: 3 मेला डीआरडीओचे शास्त्रज्ञ यांनी पुणे येथील त्यांचे कार्यालयामध्ये शासकीय कर्तव्य बजावित असताना भारताचे शत्रू राष्ट्रातील पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह ( PIO) चे हस्तक यांचेशी मोशल मिडियाच्या माध्यमातून व्हॉटअपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्कात राहिला होते. डीआरडीओचे शास्त्रज्ञ यांनी धारण केलेल्या पदाचा गैरवापर करत कर्तव्यावर असताना त्यांच्या ताब्यात असलेले संवेदनशील शासकिय गुप्त माहिती जी शत्रु राष्ट्राला मिळाल्यास भारत देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहचू शकतो अशी माहिती अनाधिकृतरित्या शत्रु राष्ट्रास पुरविली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, संपर्कात राहिले असल्याची माहिती आहे. त्यानंतर दहशतवादी विरोधी पथकाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. पुण्यातील कोर्टात हजर करुन त्याना 9 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.