पुणे - सुरुवातीला 'पिंजरा' या नावाला विरोध केला. पण जसजसा पिंजरा उलगडत गेला तस तसं माझा विरोध मावळला असल्याचे ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू म्हणाले होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉ. लागूंचा मोठा खुलासा; 'पिंजरा' नावाला विरोध पण... हेही वाचा - कलावंतांच्या दीपस्तंभाला अनेकांची श्रद्धांजली
सामना, सिंहासन, पिंजरा यासारख्या अनेक सिनेमांमध्ये लागू यांनी काम केले होते. नटसम्राट या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील आठवड्यात तन्वीर सन्मान सोहळा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला लागूंची उपस्थिती होती. यावेळी लागू म्हणाले, " 'पिंजरा' या नावाला माझा विरोध होता. आम्ही काय जनावरं होतो का? मात्र जस जस चित्रपटाचं शुटींग अनुभवत गेलो, तस तसा या प्रकरणाचा उलगडा होत गेला आणि समजलं 'पिंजरा' हा केवळ लाकडाचा किंवा लोखंडाचा नाही. हा जाणिवेचा पिंजरा आहे. या पिंजऱ्यामध्ये माणूस कसा उत्कृष्ट सापडू शकेल हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे."
लागूंचा हा शेवटचा कार्यक्रम ठरला. तन्वीर हा त्यांचा मुलगा होता, त्याचे निधन झाल्यानंतर डॉ. लागू यांनी त्याच्या नावाने पुरस्कार सुरू केला होता. लागूंचा यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 ला सातारा येथे झाला. त्यांनी 1969 मध्ये त्यांच्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. डॉ. लागू यांनी नाट्यक्षेत्र आणि सिनेक्षेत्रात त्यांच्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला होता.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करुन दिली - देवेंद्र फडणवीस