पुणे : औषधे आणि डॉक्टर ही सर्वांच्याच खिशाला कात्री लावणारी बाब आहे.बऱ्याच सर्वसामान्य कुटुंबांना उपचार पद्धती खाजगी परवडत नाही. त्यामुळे ते ससून या सरकारी दवाखान्यात उपचार घेत असतात. परंतु कित्येक वेळेला असे दिसून येते की, डॉक्टर आणि खाजगी औषध विक्रेत्यांच्या संबंधामुळे त्यांच्या नावे चिठ्ठ्या लिहून औषध खरेदी करण्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. शासकीय दवाखान्यातल्या अपुऱ्या औषधामुळे सर्वसामान्य नागरिकांना, औषध खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात.
रुग्णाला मोफत औषधे दिले जाणार : ससूनसह राज्यातील सर्वच सरकारी दवाखान्यांमध्ये अशी स्थिती आहे. अधिष्ठता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी, आदेश दिले आहेत की, ससूनमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मोफत औषधे दिले जाणार आहेत. जर कुठल्या डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन लिहून कुठल्या औषध विक्रेत्याची शिफारस केली तर, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सांगितलेले आहे.
ससून रुग्णालयात रुग्णांचे प्रमाण : पुण्यातील ससून रुग्णालयात रुग्णांचे प्रमाण दररोज दोन ते तीन हजार आहे. रुग्णबाह्य विभागात तर अकराशे ते दीड हजार रुग्ण तर अंतर रुग्ण विभागात इतर दाखल असतात. त्यांना हवी असलेले औषधे ससूनमध्ये पूर्ण मिळत नव्हती. अर्धीच औषधे त्यांना मिळायची. बाकीचे बाहेरल्या स्टोअरमधून विकत घेण्याचे सांगण्यात येत होते.परंतु आता अधिष्ठता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सर्व प्रकारचे औषध, हे दवाखान्याच्या स्टोअरमधूनच देण्यात यावेत, असा असा आदेश दिला होता.